Desh

इंधनाच्या दरवाढीचा मला काहीही फरक पडत नाही, कारण मी मंत्री आहे – रामदास आठवले

By PCB Author

September 16, 2018

जयपूर, दि. १६ (पीसीबी) – पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे मला काही फरक पडत नाही. कारण मी एक मंत्री आहे, त्यामुळे मला मोफत पेट्रोल-डिझेल मिळते, असे केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी म्हटले आहे. माझे मंत्रिपद गेल्यानंतर कदाचित मला महागाईची झळ बसेल, पण इंधनांच्या वाढत्या किंमतींमुळे जनता मेटाकुटीला आली आहे हे मला समजत आहे.  दर कमी व्हायला हवेत, असेही ते  म्हणाले.

जयपूरमध्ये आयोजित एका कार्यक्रमात आठवले बोलत होते. यावेळी ते म्हणाले की, पेट्रोल-डिझेलचे भाव कमी व्हायला हवे. माझ्या पक्षाचीही हीच भूमिका आहे. केंद्र सरकारही आता इंधनाचे दर नियंत्रणात आणण्याबाबत आता गंभीरतेने विचार करत आहे. पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्यावर ही जबाबदारी देण्यात आली आहे.

आता माझ्या वाहनांमध्ये पेट्रोल आणि डिझेल सरकारकडून भरले जाते. पण माझे मंत्रिपद गेल्यावर ही झळ मलाही बसेल.  इंधनांच्या वाढत्या किंमतींमुळे जनता हैराण झाली आहे. हे मला माहित आहे.  दर कमी व्हायला हवेत, त्यासाठी केंद्र सरकारकडून प्रयत्न सुरू आहेत, असे ते म्हणाले.