Maharashtra

इंधनच्या दरात पुन्हा वाढ; परभणीत सर्वाधिक महाग

By PCB Author

September 13, 2018

मुंबई, दि. १३ (पीसीबी) – सलग सतरा दिवस इंधन दरवाढ झाल्यानंतर अठराव्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीला ब्रेक मिळाला. त्यामुळे सणासुदीच्या दिवसात काही दिवस इंधन दरवाढ होणार नाही, अशी शक्यता असतानाच आजही पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ करण्यात आली आहे. दिल्ली आणि मुंबईत पेट्रोल १३ पैसे णि डिझेल ११ पैशांनी महागले आहे.

परभणीमध्ये इंधन दरात सर्वाधिक वाढ झाली आहे. परभणीत पेट्रोल ९०.११ रुपये प्रति लिटर झाले असून डिझेल ७८.०६ रुपये प्रति लिटर झाले आहे.

दिल्लीत पेट्रोलची किंमत प्रति लिटर ८१ रुपये झाली असून डिझेलची किंमत प्रति लिटर ७३.०८ रुपये एवढी झाली आहे. मुंबईतही पेट्रोल प्रति लिटर ८८.८९ रुपये आणि डिझेल ७७.५८ रुपये दराने विकले जात आहे. गेल्या दोन दिवसांत आंतरराष्ट्रीय बाजारात डॉलरच्या तुलनेत रुपयांची प्रचंड घसरण झाली आहे. मात्र पुढील काही महिन्यात विधानसभा निवडणुका होणार असल्याने सरकारला काही काळासाठी का होईना पण इंधन दरवाढीवर नियंत्रण ठेवावे लागणार असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. बुधवारी दिल्लीत पेट्रोलची किंमत प्रति लिटर ८०.८७ रुपये होती. तर डिझेलची किंमत प्रति लिटर ७२.९७ रुपये एवढी होती. मुंबईतही पेट्रोलचे दर प्रति लिटर ८८.२६ रुपये आणि डिझेलचे ७७.४७ रुपये एवढे होते.