Bhosari

इंद्रायणीनगर, लक्ष्यद्वीप सोसायटीतील रस्त्याचे डांबरीकरण; सीमा सावळे, सारंग कामतेकर, समर कामतेकर यांचा पाठपुरावा

By PCB Author

May 08, 2019

भोसरी, दि. ८ (पीसीबी) – इंद्रायणीनगर येथील लक्ष्यद्वीप सोसायटी, इंटलेजन्ट स्कूलजवळील   रस्त्याचे डांबरीकरणाचे काम पूर्ण करण्यात आले आहे.  या कामांबाबत  स्थायी समितीच्या माजी अध्यक्षा व विद्यमान नगरसेविका सीमा सावळे, भाजपचे शहर सरचिटणीस सारंग कामतेकर आणि युवा नेते समर कामतेकर यांनी  पाठपुरावा केला होता.

या  रस्त्यांचे डांबरीकरण करण्याच्या सुचना    स्थायी समितीच्या माजी अध्यक्षा सीमा सावळे यांनी महापालिका प्रशासनाला दिल्या होत्या.  तसेच रस्त्याच्या खडीकरण आणि  डांबरीकरण कामासाठी  लागणाऱ्या  आवश्यक निधीची तरतूद करून घेतली होती. हा निधी मंजूर झाल्यानंतर  या रस्त्याच्या डांबरीकरणाच्या कामाला  सुरूवात करण्यात आली  होती.

या कामांसाठी भाजपचे शहर सरचिटणीस सारंग कामतेकर आणि युवा नेते समर कामतेकर यांनीही   महापालिका प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा सुरू  केला होता.  आता  या रस्त्याचे डांबरीकरण पूर्ण झाले आहे. या कामामुळे नागरिकांमधून समाधान  व्यक्त  केले जात आहे.