इंद्रायणीनगर येथे रंगणार होम मिनिस्टरचा खेळ!

0
328

– नगरसेविका नम्रता लोंढे यांच्याकडून विविध कार्यक्रमांचे आयोजन

पिंपरी, दि. २९ (पीसीबी) – पिंपरी- चिंचवड भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त राजर्षी शाहू महाराज प्रतिष्ठाणचे संस्थापक योगेश लोंढे व नगरसेविका नम्रता लोंढे यांच्यातर्फे क्रांतीनाना मळेगावकर प्रस्तुत न्यू होम मिनीस्टर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

मंगळवारी (दि.३०) इंद्रायणीनगर, भोसरी येथे तिरुपती चौकात नम्रता लोंढे यांच्या जनसंपर्क कार्यालयाजवळ हा सोहळा रंगणार असून, यामध्ये पैठणीसह अनेक आकर्षक बक्षिसांची रेलचेल असणार आहे. तसेच, वैकुंठ रथाचे लोकपर्पण होणार असून अनेक दिग्गज उपस्थिती लावणार आहेत.
मंगळवारी सायंकाळी सहाच्या सुमारास या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून कोरोना नियमांचे तंतोतंत पालन केले जाणार आहे.

कार्यक्रमास भाजपा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ, माजी खासदार तथा भाजपा महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस निलेश राणे, माळशिरस विधानसभेचे आमदर राम सातपुते, ओबीसी भाजपा मोर्चा अध्यक्ष माजी आमदार योगेश टिळेकर यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.

विजेत्यांना आकर्षक बक्षीसे…
कार्यक्रमात १० लकी ड्रॅा प्रश्नमंजूषा स्पर्धेतील विजेत्यांना पैठणी व बक्षिसे देण्यात येणार आहेत. त्यामध्ये विजेत्यांना प्रथम क्रमांक एल ई डी टीव्ही, द्वितीय क्रमांक रेफ्रिजिरेटर, तृतीय क्रमांक वॉशिंग मशीन, चतुर्थ क्रमांक मायक्रोव्हेव ओव्हन, पाचवा क्रमांक गॅस शेगडी अशी बक्षिसे तसेच, पाच लकी ड्रॉ मधील विजेत्यास मनाची पैठणी मिळणार आहे. शिवाय प्रत्येक सहभागी महिलेस आकर्षक भेटवस्तु देण्यात येणार आहे. ज्या महिलांना स्पर्धेत भाग घ्यायचा आहे त्यांना कुपन घरपोच मिळणार आहेत व ते कुपन कार्यक्रम स्थळी स्वीकारले जाणार आहेत. त्याबरोबरच कै. भगवान तात्या लोंढे यांच्या स्मरणार्थ वैकुंठरथ लोकार्पण समारंभ आयोजित करण्यात आलेला आहे.

महिलांप्रति आदर व्यक्त करण्याची संधी…
कोरोना काळात सामाजिक आर्थिक स्थिती बिकट असताना महिलांचे योगदान अतिशय महत्वाचे ठरले. लॉकडाऊन काळात महिलांना मात्र दुप्पट काम करावे लागत असल्याचे चित्र होते. मार्गदर्शक आमदार महेश लांडगे हे नेहमीच महिलेच्या विकासासाठी आग्रही असून माहिलावर्गासाठी अनेक भरीव कामे केली आहेत. यामुळे कोरोना काळातून सावरत असताना महिलांप्रती आदर व्यक्त करण्यासाठी तसेच घरगुती कामातून त्यांना विसावा देऊन बक्षिसेही मिळवून देण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले तसेच सामाजिक बांधिलकी जपत वैकुंठरथाचेही लोकार्पण केले जाणार असल्याचे आयोजक योगेश लोंढे यांनी सांगितले. तसेच, कामातून विसावा घेऊन अधिकाधिक महिलावर्गाने यामध्ये सहभाग घ्यावा असे आवाहनही त्यांनी केले आहे.