इंद्रायणीनगरमधील स्केटिंग मैदानाचे काम लवकर पूर्ण करा – आमदार लांडगे

0
599

भोसरी, दि. २६ (पीसीबी) – इंद्रायणीनगरमध्ये उभारण्यात येत असलेल्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्केटिंग मैदानाचे काम लवकर पूर्ण करा. कामाचा दर्जा उच्च ठेवा, अशा सूचना आमदार महेश लांडगे यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना बुधवारी (दि. २६) दिल्या.

इंद्रायणीनगरमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्केटिंग मैदान विकसित करण्याचे काम वर्षभरापूर्वी सुरू करण्यात आले आहे. आमदार महेश लांडगे यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांसोबत या कामाची पाहणी केली. यावेळी नगरसेविका नम्रता लोंढे, कार्यकारी अभियंता संजय घुबे, उपअभियंता विजय वाईकर, कनिष्ठ अभियंता राहुल जन्नू, निलेश केदार, वास्तूविशारद पंकज कांबळे, राहुल राणे, योगेश कुमावत, ठेकेदार आनंद निकुंभ, मंदार कुलकर्णी आदी उपस्थित होते.

आमदार महेश लांडगे म्हणाले, “पिंपरी-चिंचवड शहाराला खेळाचा मोठा वारसा आहे. इंद्रायणीनगर येथे शहरातील पहिलेच आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्केटिंग मैदान होणार आहे. त्याचे काम दर्जेदार करण्यात यावे. कामाला वेग देण्यात यावा. सीमाभिंतीलगत झाडे लावण्यात यावीत. तसेच याठिकाणी अनेक नाविन्यपूर्ण सुविधा उपलब्ध करून दिले जावेत.”