Maharashtra

इंदुरीकर महाराजांनी शेती करताना तरी कामासाठी येणाऱ्या महिलांसोबत व्यवस्थित बोलावं – तृप्ती देसाई

By PCB Author

February 16, 2020

अहमदनगर,दि.१६(पीसीबी) – शेती करताना तरी इंदुरीकर महाराजांनी शेतात कामासाठी येणाऱ्या महिलांसोबत व्यवस्थित बोलावं. त्यांनाही जर अपमानास्पद बोलाल तर काही दिवसांनी स्वतःच्या शेतातही काम करता येणार नाही. अशी तुमची गत होऊ शकते, अशी टीका भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी प्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प. निवृत्ती महाराज इंदुरीकर यांच्यावर केली आहे.

आपला देश धर्मानुसार आणि पुराणानुसार चालत नाही. तो संविधानानुसार चालतो. इंदुरीकर महाराजांनी कीर्तन करायचं की, शेती करायची हा त्यांचा प्रश्न अस म्हणत तृप्ती देसाई यांनी पुन्हा एकदा महाराजांवर टीकेची झोड उठवली आहे.

दरम्यान, या वादामुळे मला त्रास होतोय. वाद मिटला नाही तर मी कीर्तन सोडून शेती करेन, असं इंदुरीकर महाराजांनी एका कीर्तनात म्हंटल होतं. यावरुन तृप्ती देसाई पुन्हा एकदा महाराजांवर बरसल्याचं पाहायला मिळालंय.