इंदुरीकरांवर गुन्हा दाखल झाला नाही तर मुख्यमंत्र्यांना दालनात कोंडून अधिवेशनात गोंधळ घालू’

0
526
पुणे, दि.१९ (पीसीबी) – कीर्तनकार निवृत्ती देशमुख (इंदोरीकर) यांनी “सम तिथीला स्त्री संग केला तर मुलगा होतो आणि विषम तिथीला स्त्री संग केल्यास मुलगी होते,’ असे विधान ओझर येथे झालेल्या किर्तनात त्यांनी केले. त्यावर अंधश्रद्धा निर्मूलन समितीने आक्षेप घेतल्याने आता नव्या वादाला तोंड फुटले आहे.
याच पार्श्वभूमीवर इंदोरीकर यांनी दिलगिरी व्यक्त केली असली तरीही त्यांच्यावर गुन्हा दाखल केला गेला पाहिजे. तशी मागणी पोलिसांकडे केली असून, त्यांनी सकारात्मक आश्वासन आम्हाला दिले आहे. मात्र तरीही गुन्हा दाखल झाला नाही तर, उद्धव ठाकरे यांना त्यांच्या दालनात कोंडून अधिवेशनात गोंधळ घालू, असा इशारा तृप्ती देसाई यांनी दिला. इंदोरीकर महाराज यांच्याविरोधात तातडीने गुन्हा दाखल झाला पाहिजे. यासाठी अहमदनगर जिल्हा पोलीस अधीक्षक यांची भेट घेतली असून, त्यांच्याकडे लेखी तक्रारसुद्धा करण्यात आली आहे. इंदोरीकर हे आपल्या अनेक कीर्तनांमधून महिलांचा अपमान करतात. त्यामुळे असा अपमान सहन केला जाणार नसल्याचं देसाई यांनी सांगितले.