इंदुरीकरांनी ‘ते’ विधान करायला नको होते

0
398

कोल्हापूर, दि.१७ (पीसीबी) – इंदुरीकर महाराजांनी केलेल्या वक्तव्याविषयी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पक्षाची भूमिका मांडली. पत्रकार परिषदेत बोलताना पाटील म्हणाले

पाटील म्हणाले “इंदुरीकर महाराजांची कीर्तनं जनप्रबोधनासाठी असतात. मात्र, इंदुरीकरांनी ‘ते’ विधान करायला नको होते. इंदुरीकर महाराजांनी केलेले ते विधान चुकीचंच आहे. त्यांच्या वक्तव्याचे समर्थन करत नाही. पण, एका वाक्याने व्यक्ती खराब होत नाही. एका वाक्यानं माणसाची तपश्चर्या घालवू नका,” असं आवाहन पाटील यांनी केले.

पुढे पाटील म्हणाले,”राष्ट्रवादीचे नेते वारंवार खोटे बोलत आहेत. आम्ही हे सरकार पाडणार नाही. हे सरकार आपोआप पडेल, असा दावा त्यांनी यावेळी केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीचे सरकार पाडून दाखवावे असे आव्हान भाजपाला दिले होते. त्याला पाटील यांनी उत्तर दिले.