इंदुरीकरांच्या वक्तव्याचं समर्थन करता येणार नाही; पण त्यांच्या प्रबोधनामुळे अनेक चुकीच्या चालीरीती बंद झाल्या – बाळासाहेब थोरात

0
322

संगमनेर,दि.१८(पीसीबी) – इंदुरीकरांच्या वक्तव्याचं समर्थन करता येणार नाही. पण २५ वर्षात त्यांनी केलेल्या प्रबोधनामुळे अनेक चुकीच्या चालीरीती बंद झाल्या आहेत. ते चालवत असलेली शाळा असेल किंवा समाज प्रबोधन काम मात्र योग्यच आहे, असं म्हणत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरातांनी अप्रत्यक्षपणे इंदुरीकरांना पाठिंबा दिला आहे.

प्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प. निवृत्ती महाराज इंंदुरीकरांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर अनेकांनी त्यांच्यावर सडकून टीका केली. त्यांच्या वक्तव्यावर बाळासाहेब थोरात यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. संगमनेरमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी इंदुरीकरांच्या वक्तव्यामुळे उफाळलेल्या वादावर भाष्य केलं आहे.

इंदुरीकरांनी केलेल्या वक्तव्यावरुन अनेकांनी त्यांच्यावर टीका केली. त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणीही केली. या सगळ्यावर बोलाताना इंदुरीकर आणि माझी चांगली ओळख असल्याचं थोरातांनी सांगितलं.