Desh

इंदिरा गांधी, प्रियंका गांधींतील साम्य; उत्तर प्रदेश काँग्रेसकडून फोटो शेअर

By PCB Author

March 18, 2019

प्रयागराज, दि. १८ (पीसीबी) – काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी यांची  त्यांची  दिवंगत आजी व माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याशी  तुलना केली जाते.  इंदिरा गांधी यांच्यातील बरेच गुण प्रियंका गांधी यांच्यामध्ये असल्याचेही बोलले जाते. याची प्रचिती प्रियांका गांधी यांच्या उत्तर प्रदेश दौऱ्यावर आज (सोमवार) आली. या दौऱ्यादरम्यानचा एक फोटो काँग्रेसने ट्विट केला आहे.

प्रियांका गांधी-वधेरा  आज  प्रयागराज येथे दाखल झाल्या.  त्यांनी येथून ‘गंगा यात्रा’ सुरू केली आहे. सकाळी त्यांनी प्रयागराज येथील हनुमान मंदिराला भेट हनुमानाचे दर्शन घेतले. त्यांचा हाच फोटो उत्तर प्रदेश काँग्रेस पक्षाने ट्विट केला आहे.  या फोटोमध्ये प्रियंका हनुमानाच्या मूर्तीला फुले वाहत असताना दिसत आहेत. या फोटो सोबत काँग्रेसने इंदिरा गांधी यांचा देखील फोटो ट्विट केला आहे. यामध्येदेखील इंदिरा हनुमानाच्या मुर्तीला फुले वाहत असताना दिसत आहेत.

या दोन फोटोंना उत्तर प्रदेश काँग्रेसने परंपरा आणि रितीरिवाज कधीच बदलणार नाहीत,  अशी कॅप्शन दिली आहे.  दरम्यान,  प्रियांका गांधी-वधेराही १७ ते २० मार्च दरम्‍यान तीन दिवसांच्या उत्तर प्रदेश दौऱ्यावर आहेत. जलमार्गाने काढलेल्‍या या यात्रेवेळी प्रियांका गांधी जनतेशी संवाद साधणार आहेत.