इंदिरा गांधींप्रमाणेच होऊ शकते माझीही हत्या- अरविंद केजरीवाल

0
632

नवी दिल्ली, दि. १८ (पीसीबी) – ज्याप्रकारे माजी पंतप्रधान इंदिरा गांधींची हत्या त्यांच्याच सुरक्षारक्षकाने केली होती, त्याचप्रमाणे मला सुरक्षा देणारे पोलीस अधिकारीच माझी हत्या करू शकतात अशी भीती दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी व्यक्त केली आहे. याआधीही पंतप्रधान नरेंद्र मोदी माझी हत्या करवू शकतात अशी शंका केजरीवाल यांनी व्यक्त केली आहे.

नुकतेच पंजाब केसरी या वर्तमानपत्राला अरविंद केजरीवाल यांनी मुलाखत दिली आहे. ‘माझ्या सुरक्षेसाठी देण्यात आलेले पोलीस अधिकारी हे नरेंद्र मोदींच्या आदेशानुसार काम करतात. त्यामुळे ज्याप्रमाणे इंदिरा गांधींची हत्या त्यांच्या सुरक्षा रक्षकाने केली होतीच त्याप्रमाणे माझीही हत्या हे अधिकारी करू शकतात. माझ्या जीवन-मरणामध्ये केवळ दोन मिनिटांचे अंतर आहे.’ असा दावा केजरीवाल यांनी केला आहे.