Pune Gramin

इंदापूरात रिव्हॉल्वर साफ करताना चुकून उडालेली गोळी लागून छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षाचा मृत्यू

By PCB Author

November 05, 2018

पुणे, दि. ५ (पीसीबी) – इंदापूर भवानीनगर येथील छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रदीप केशवराव निंबाळकर (वय ४५) यांचा आज (सोमवार) दुपारी अडीचच्या सुमारास रिव्हॉल्वर साफ करताना चुकून उडालेली गोळी लागून मृत्यू झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, प्रदीप निंबाळकर हे आज दुपारी सणसर (ता. इंदापूर) येथील राहत्या घराच्या वरच्या मजल्यावर होते. तेथे ते रिव्हॉल्वर साफ करत होते. त्यावेळी चुकून गोळी उडाल्याने ते जखमी झाले. गोळीच्या आवाजाने घरातील सदस्यांनी जाऊन पाहिले असता, ते रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसले. त्यानंतर तातडीने त्यांना बारामतीतील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचरापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता.