इंदापूरातील भीमा नदीत बुडून दोन सख्या बहिणींचा मृत्यू

0
445

पुणे, दि. २५ (पीसीबी) – इंदापूर तालुक्यातील शहा गावातून वाहनाऱ्या भीमा नदीत बुडून दोन सख्या बहिणींचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी (दि.२४) घडली.

पूजा अशोक काळे (वय १०) आणि सारिका अशोक काळे (वय १२, दोघीही रा. शहा गाव, इंदापूर, पुणे) असे मृत दोघा सख्या बहिणींची नावे आहेत.

प्राप्त माहितीनुसार, रविवारी पूजा आणि सारिका शहा गावजवळील भीमा नदीच्या खोऱ्यात पोहण्यासाठी गेल्या होत्या. पुजाला पोहता येत नसल्याने सारिका तिला वाचवण्यासाठी धावली. या झटापटीत दोघींचाही पाण्यात बुडून मृत्यू झाला. त्यांच्यासोबत असणारा बाळूने मुलींच्या नातेवाईकांना याबाबत सांगितले. त्यानंतर ते मुलींच्या मदतीला धावले.  मुलींचा शोध घेतला असता पुजाचा मृतदेह हाती लागला. मात्र, सारिकाचा मृतदेह सापडला नव्हता. आज (सोमवार) अखेर प्रशासनाने पाणबुडीच्या सहाय्याने सारिकाचा मृतदेह बाहेर काढला. या दुखद घटनेमुळे काळे कुटुंबासह शहा गावात शोककळा पसरली आहे.