आसाममध्ये बलात्कार आणि हत्येप्रकरणी १९ वर्षीय तरूणाला फाशीची शिक्षा  

0
850

गुवाहटी, दि. ७ (पीसीबी) – आसाममधील नागाव जिल्ह्यात एका ११ वर्षीय मुलीच्या सामुहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणी एका १९ वर्षीय तरूणाला स्थनिक न्यायालयाने आज (शुक्रवारी) फाशीची शिक्षा सुनावली. बाल अत्याचार प्रतिबंध कायदा अर्थात पोक्सो कायद्यांतर्गत अल्पवयीन मुलीच्या हत्येसाठी फाशीची तर बलात्कारासाठी जन्मठेपेची शिक्षा त्याला सुनावली. इतर ४ आरोपींची सबळ पुराव्यांअभावी निर्दोष सुटका करण्यात आली.    

या प्रकरणात इतर दोन अल्पवयीन मुलेही दोषी ठरली आहेत. त्यांची याच आठवड्यात  तीन वर्षांसाठी सुधारगृहात रवानगी केली होती. नागावचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक रिपूल दास यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा तपास करण्यात आला होता.

नागाव जिल्ह्यातील धनियाभेटी लालंग गावात राहणाऱी एक पाचवीच्या वर्गातील मुलगी घरात एकटीच असताना २३ मार्च रोजी ८ जणांनी सामुहिक बलात्कार करुन तिला पेटवून दिले होते.  या मुलीला गुवाहटी येथील सरकारी रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केले होते. मात्र, उपचारांदरम्यान दुसऱ्याच दिवशी तिचा मृत्यू झाला होता.