Maharashtra

आशिष शेलार मांत्रिकाच्या संपर्कात ?

By PCB Author

November 18, 2019

मुंबई,दि.१८ (पीसीबी)- राज्यामध्ये सत्तास्थापनेचा तिढा अद्यापही सुटलेला नाही. अशातच आशिष शेलार मांत्रिकाच्या संपर्कात आहेत, असे राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले होते. आता राष्ट्रवादी काँग्रेसनं एक फोटो ट्विट करत यासंदर्भातील पुरावा देत असल्याचे म्हटले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसनं आपल्या ट्विटर हँडलवर आशिष शेलार आणि एक मांत्रिकाच्या वेशातील व्यक्तिसोतबचा फोटो ट्विट केला आहे. व्यक्तीच्या गळ्यामध्ये अनेक माळा असून हातात मोठ्या अंगठ्या असल्याचं दिसत आहे. हा फोटो म्हणजे आव्हाडांनी केलेल्या दाव्याचा पुरावा आहे, असे या ट्विटमध्ये नमूद करण्यात आले आहे.

आशिष शेलार मांत्रिकाच्या संपर्कात आहेत. त्यांनी काहीतरी तंत्रमंत्र केलं असंल. अमूक एक अदृष्य शक्ती आहे. पण असल्या गोष्टींवर आमचा विश्वास नाही. आमच्या अंतर्मनातून आलेल्या शक्ती या प्रचंड एकनिष्ठ, बलवान आणि स्वत:च्या विचारबरोबर घेऊन जाणाऱ्या आहेत, अशी प्रतिक्रीया आव्हाडांनी दिली होती.

दरम्यान, हा फोटो नक्की कोणाचा आहे याबद्दलची माहिती समोर आलेली नाही. शेलार यांनीही याबद्दल अद्याप कोणतीही प्रतिक्रिया सोशल नेटवर्किंगच्या माध्यमातून नोंदवलेली नाही. आता राष्ट्रवादीच्या या टीकेला शेलार काय उत्तर देतात?,याकडेच सर्वांचं लक्ष लागून राहिले आहे.