आशिया पॅसिफिक लीडरशिप फेलोशिपसाठी प्रा. डॉ. मंगल धेंड यांची निवड  

0
320

पुणे, दि. १५ (पीसीबी) – अमेरिकेच्या प्रसिद्ध ईस्ट वेस्ट रिसर्च सेंटर च्या वतीने अमेरिकेच्या स्पर्धात्मक व विख्यात ईस्ट वेस्ट अशिया पॅसिफिक लीडरशिप २०१९ फेलोशिप साठी प्राध्यापक डॉ.  मंगल हेमंत धेंड यांची निवड करण्यात आली आहे.  डॉ. धेंड या ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरियल सोसायटीच्या कॉलेज ऑफ इंजिनीरिंग च्या विदयुत विभागामध्ये गेली २७ वर्षे कार्यरत आहेत.

अठरा देशांमधून निवड करण्यात आलेल्या २५ जणांमध्ये धेंड यांची निवड झाली आहे.  हा प्रशिक्षण कालावधी ४ महिन्याचा असून इंडो युएसए व अशिया पॅसिफिक रिजन मध्ये शांतता, समृद्धी, समजूतदारपणा निर्माण करण्यासाठी त्यांनी प्रशिक्षण घ्यावे म्हणून अमेरिकेने त्यांना फेलोशिप दिलेली आहे.  त्यांचा गाढा अनुभव लक्षात घेऊन त्यांना फेललोशिप देण्यात आलेली आहे.

डॉ. धेंड यांची दिल्लीच्या फ्रेंडशिप फोरम ऑफ इंडिया तर्फे ” लिडिंग एजुकेशनालिस्ट ऑफ इंडिया २०१९’ आणि “भारत एक्सलन्स २०१९ अवॉर्ड’  या दोन नॅशनल अवॉर्ड साठी  निवड करण्यात आलेली आहे. प्राध्यापक डॉ.   मंगल धेंड यांचा ज्ञानाचा, गुणांचा व आज पर्यंत केलेल्या कार्याचा हा सन्मान मानला जात आहे.