आशियातील सर्वात मोठ्या सौर उर्जा प्रकल्पाचे उद्घाटन

0
1878

नवी दिल्ली, दि. १० (पीसीबी) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगमार्फत मध्य प्रदेशातील रीवामध्ये स्थापन करण्यात आलेल्या 750 मेगाव्हॅटचा सौरऊर्जा प्रकल्प देशाला समर्पित केला. मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्यासह इतर मंत्रीही या कार्यक्रमासाठी उपस्थित होते. हा प्रकल्प आशियातील सर्वात मोठा सौरऊर्जा प्रकल्प असून त्याची क्षमता 750 मेगाव्हॅट आहे.

मध्य प्रदेशातील रीवा येथील सौरऊर्जा प्रकल्पाच्या उद्घाटनावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित केलं. त्यावेळी ते म्हणाले की, आज रीवाने इतिहास रचला आहे. जेव्हा आम्ही आकाशातून टिपलेल्या या प्लांटचा व्हिडीओ पाहतो, त्यावेळी असं वाटतं की, हजारो सोलार पॅनल शेतातल्या पिंकाप्रमाणे डोलत आहेत. रीवाचा सौरऊर्जा प्रकल्प या संपूर्म क्षेत्राला ऊर्जेचं केंद्र बनणार आहे. यामुळे मध्यप्रदेशातील लोकांना लाभ मिळणार असून दिल्लीती मेट्रोलाही वीज मिळणार आहे.पंतप्रधान मोदींनी सांगितलं की, ‘आता रीवामधील नागरिक गर्वाने सांगितील की, दिल्लीतील मेट्रो आमचा रीवा चालवत आहे. याचा फायदा मध्यप्रदेशातील गरीब, मध्यम वर्गीय, शेतकरी आणि आदिवासी लोकांना होणार आहे.

दिल्लीतील मेट्रोलाही होणार फायदा
पंतप्रधान मोदींनी सांगितलं की, रीवाची ओळख आई नर्मदेमुळे आणि पांढऱ्या वाघांमुळे आहे. आता रीवाचं नाव आशिया खंडातील सर्वात मोठ्या सौरऊर्जा प्रकल्पाशी जोडलं जाणार आहे. रीवाचा हा सोलार प्लांट या संपूर्ण क्षेत्राला या दशकातील सर्वात मोठं ऊर्जेचं केंद्र बनवण्यासाठी मदत करणार आहे. या प्रकल्पामुळे मध्यप्रदेशमधील उद्योगधद्यांसोबतच दिल्लीतील मेट्रोलाही फायदा होणार आहे.

पंतप्रधानांनी सांगितलं की, मध्यप्रदेशातील रीवामध्ये आशियातील सर्वात मोठा सौरऊर्जा प्रकल्प सुरु करण्यात आला आहे. हा प्रकल्प रीवा जिल्ह्यातील मुख्यालयातून 25 किलोमीटर दूर गुढमध्ये 1590 एकरमध्ये पसरले आहेत. हा प्रकल्प रीवा अल्ट्रा मेगा सोलार लिमिटेड, एमपी ऊर्जा विकास लिमिटेड आणि भारताचे सौरऊर्जा निगम यांचा एक संयुक्त उपक्रम आहे.