आशियाई चषक १५ सप्टेंबरपासून; रोहीत शर्माकडे भारतीय संघाची धुरा

0
546

नवी दिल्ली, दि. १ (पीसीबी) – आशियाई चषकासाठी भारताचा कर्णधार विराट कोहली याला विश्रांती देण्यात आली असून त्याच्या अनुपस्थितीमध्ये भारताचा सलामीचा धडाकेबाज फलंदाज रोहीत शर्मा याच्याकडे कर्णधार पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. त्याचबरोबर  शिखर धवनला संघाचा उप-कर्णधार म्हणून घोषित केले आहे.

आशियाई चषकासाठी बीसीसीआयने आज (शनिवार) भारतीय संघाची घोषणा केली.    महाराष्ट्राच्या केदार जाधवनेही प्रदीर्घ कालावधीनंतर भारतीय संघात पुनरागमन केले आहे. तर खलिल अहमद या नवोदीत खेळाडूला भारतीय संघात स्थान देण्यात आले आहे. १५ सप्टेंबरपासून युएईत आशिया चषक स्पर्धा होणार आहे.

भारताचा संघ असा – रोहित शर्मा (कर्णधार), शिखर धवन (उप-कर्णधार), लोकेश राहुल, अंबाती रायडू, मनिष पांडे, केदार जाधव, महेंद्रसिंह धोनी (यष्टीरक्षक), दिनेश कार्तिक, कुलदीप यादव, हार्दिक पांड्या, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, शार्दुल ठाकूर, खलिल अहमद