आशियाई क्रीडा स्पर्धा; १० मीटर एअर रायफल मिश्र दुहेरीत भारताला कांस्य पदक 

0
632

जकार्ता, दि. १९ (पीसीबी) – इंडोनेशियातील  जकार्ता आणि पालेमबांगमध्ये १८ व्या आशियाई क्रीडा स्पर्धेला शनिवारी (दि.१८) दिमाखात सुरुवात झाली. भारताचे नेमबाज अपूर्वी चंदेला आणि रवी कुमारने या स्पर्धेत पहिल्याच दिवशी भारताचे पदकांचे खाते उघडले आहे. त्यांनी १० मीटर एअर रायफल मिश्र दुहेरी प्रकारात कांस्य पदक  पटकावले आहे.

अपूर्वी चंदेला आणि रवी कुमार यांनी  ३९०.२ गुणांची नोंद करत स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी कांस्य पदकावर भारताचे नांव कोरले. अंतिम फेरीत कोरिया, मंगोलिया या प्रतिस्पर्ध्यांशी टक्कर देत कांस्यपदकाची कमाई केली. तर चायनीज तैपेईच्या लीन यींगशीन आणि लू शाओचुआन जोडीने सुवर्ण तर चीनच्या झाओ आणि यांगने रौप्यपदक पटकावले.

१८व्या आशियाई स्पर्धांचा उद्घाटन सोहळा शनिवारी जकार्ता येथील गिलोरा बंग कार्नो स्टेडियमवर उत्साहात पार पडला. या स्पर्धेसाठी भारताचे ५७२ स्पर्धक दाखल  झाले आहेत. इंडोनेशियात जकार्तातीली पालेमबांग येथे या स्पर्धा होत आहेत.