आशियाई क्रीडा स्पर्धा; नेमबाजीत भारताच्या सौरभ चौधरीला सुवर्णपदक

0
732

जकार्ता, दि. २१ (पीसीबी) – आशियाई क्रीडा स्पर्धेत  सलग तिसऱ्या दिवशीही  भारतीय खेळाडूंचे पदक मिळवून देण्याचे काम सुरू  आहे. १० मी. एअर पिस्तुल प्रकारात भारताच्या सौरभ चौधरीने सुवर्णपदक  पटकावले आहे. अंतिम फेरीत सौरभने जपानच्या टी. मस्तुदाला मागे टाकत भारताला सुवर्णपदक मिळवून दिले. तर याच प्रकारात भारताच्या अभिषेक वर्माला कांस्यपदक मिळाले आहे.

पात्रता फेरीतही सौरभ चौधरीने अव्वल स्थान मिळवले होते. अंतिम फेरीतही सौरभ आणि अभिषेक यांनी दिग्ग्ज खेळाडूंशी लढत  देत पदकांच्या शर्यतीत आपले स्थान कायम ठेवले होते.

भारतीय नेमबाजांनी आतापर्यंत देशाला ५ पदके मिळवून दिली आहेत. पहिल्या दिवशी अपुर्वी चंदेला-रवी कुमार जोडीने १० मी. एअर रायफल प्रकारात कांस्यपदकाची कमाई केली होती. दुसऱ्या दिवशी दिपक कुमारने १० मी. एअर रायफल प्रकारात रौप्यपदकाची कमाई केली. यानंतर ट्रॅप नेमबाजीत भारताच्या लक्ष्य शेरॉनने रौप्य पदक  पटकावले होते.