Desh

आशियाई क्रीडा स्पर्धा; धावपटू हिमा दास आणि मोहम्मद अनस याहिया यांना रौप्यपदक

By PCB Author

August 26, 2018

जकार्ता, दि. २६ (पीसीबी) – भारतीय धावपटू हिमा दास आणि मोहम्मद अनस याहिया या दोघांनी अॅथलेटिक्समध्ये ४०० मीटर प्रकारात रौप्यपदकांची कमाई केली आहे. हिमाने अंतिम फेरीत ५०.७९ सेकंदात ४०० मीटरचे अंतर पार केले तर मोहम्मदने ४५.६९ सेकंदात ४०० मीटरचे अंतर कापून रौप्यपदकाला गवसणी घातली.  

आशियाई क्रीडा स्पर्धेचा आजचा आठवा दिवस असून आजच्या खेळांत आतापर्यंत भारताने ४ रौप्य पदकांची कमाई केली आहे. आजचे पहिलं रौप्यपदक भारतीय घोडेस्वार फवाद मिर्झाने पुरुष एकेरीत पटकावले तर दुसरे रौप्यही घोडेस्वारीतच मिळाले. भारतीय टीमने शानदार कामगिरी करत हे पदक आपल्या नावावर केले. त्यानंतर आता अॅथलेटिक्समध्येही हिमा आणि मोहम्मदने चमकदार कामगिरी करत आणखी दोन रौप्यपदकांची भर भारताच्या खात्यात टाकली आहे.

दरम्यान, बॅडमिंटन स्टार सायना नेहवाल आणि पी. व्ही. सिंधू महिला एकेरीत तसेच तीरंदाजीच्या कंपाउंड प्रकारात भारतीय टीम उपांत्यफेरीत दाखल झाली असून तीन पदके निश्चित झाली आहेत.