आशियाई क्रीडा स्पर्धा; अॅथलेटिक्समध्ये मनजीत सिंहला सुवर्णपदक

0
874

जकार्ता, दि. २८ (पीसीबी) – आशियाई क्रीडा स्पर्धेच्या दहाव्या दिवशी पुन्हा एकदा अॅथलेटिक्सने भारताच्या सुवर्णपदकाच्या खात्यात भर टाकली. मनजीत सिंह आणि जिनसन जॉन्सन यांनी ८०० मीटर शर्यतीत अनुक्रमे सुवर्ण आणि रौप्य पदकाची कमाई केली. मनजीतने १:४६:१५, तर जिनसनने १:४६:३५ अशी वेळ नोंदवली. सुरुवातीला सावकाश सुरुवात केलेल्या दोन्ही भारतीयांनी निर्यायक क्षणी गती घेत आपल्या प्रतिस्पर्ध्यांना मागे टाकले.

त्याचबरोबर सकाळच्या सत्रात भारताच्या पुरुष तिरंदाजी संघाने रौप्यपदकाची कमाई केली . अटीतटीच्या लढतीत शूटऑफमध्ये कोरियाच्या संघाने भारतीय संघावर मात करत विजेतेपद पटकावले. भारतीय संघाचे हे तिरंदाजीमधले दुसरे रौप्यपदक ठरले आहे. शूटऑफमध्ये दोन्ही संघाचे गुण हे समसमान झाले होते. मात्र कोरियाच्या खेळाडूंनी लक्ष्याच्या जवळ अधिक मारा केल्यामुळे त्यांना या स्पर्धेचे विजेतेपद देण्यात आले. यासोबत कुराश प्रकारात भारताच्या भारताच्या मालप्रभा जाधवला कांस्य तर पिनाकी बलहाराला रौप्यपदक मिळाले.