Maharashtra

आव्हाडांची मोदींवर परखड टीका,”तिथे मॅप बदलले जातायेत आणि आपण इथे ॲप वर बंदी घालतोय,”

By PCB Author

July 01, 2020

मुंबई ,दि.१ (पीसीबी) -राष्ट्रवादी काँग्रेस नेते आणि गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी “तिथे मॅप बदलत जात आहे, आणि आपण इथे ॲप वर बंदी घालतोय. काय पोरकटपणा आहे” अशी परखड टीका पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केली 

चीनची भारतातील घुसखोरी रोखण्यासाठी भारताने पाहिलं टेकनिकल पाऊल उचलत चीनच्या टिक टॉक, शेअर इट, हॅलो, यूसी ब्राऊझर , कॅम स्कॅनर यासारखी एकूण 59 अ‌ॅप भारतामध्ये सरकारनं बॅन केली आहेत.

भारत-चीन बॉर्डर वरती होत असलेल्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर आव्हाड म्हणाले, तिथे मॅप बदलले जात आहेत, आणि आपण इथे ॲप वर बंदी घालतोय. काय पोरकटपणा आहे! कारण आपण वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनचे सदस्य आहोत आणि आपण स्वाक्षरी केलेल्या कराराच्या कलम २ आणि १४ (सी) – २ या कलमांनुसार ही बंदी शक्य आहे का ? कशाला ही धूळफेक?, असा प्रश्न केंद्र सरकारला आव्हाडांनी विचारला आहे.