Banner News

आवाज वाढवू नको डीजे…न्यायालयाचा निर्णय आहे, विसर्जन मिरवणुकीत डीजे, डॉल्बीला परवानगी नाही

By PCB Author

September 14, 2018

मुंबई, दि. १४ (पीसीबी) – गणेशोत्सवात विसर्जन मिरवणुकीत डीजे आणि डॉल्बी साउंड सिस्टमवर बंदी घालत मुंबई हायकोर्टाने दणका दिला आहे. सण येत जात राहतील, पण उत्सवातील गोंगाटाकडे आम्ही दुर्लक्ष करू शकत नाही, असे हायकोर्टाने सुनावले. यामुळे यंदा विसर्जन मिरवणुकांमध्ये पारंपरिक वाद्यांचा दणदणाट पाहायला मिळणार आहे.

गणपती विसर्जन मिरवणुकांमध्ये डीजे आणि डॉल्बी साउंड सिस्टमचा वापराला मुंबई हायकोर्टाचा तूर्त नकार दिला आहे. तसेच सण येत जात राहतील, पण उत्सवातील गोंगाटाकडे आम्ही दुर्लक्ष करू शकत नाही. मात्र साऊंड सिस्टिमच्या वापरावर सरसकट बंदी घालणं कितपत योग्य आहे? असा सवाल करत या प्रकरणी राज्य सरकारने भूमिका स्पष्ट करावी, असे निर्देश हायकोर्टाने दिले आहेत. तांत्रिक कारणामुळे या प्रकरणी पुढील सुनावणी १९ सप्टेंबरपर्यंत तहकूब करण्यात आली आहे.