आवश्यकता असेल तरच बाहेर पडा अन्यथा लाठीचा प्रसाद खा !

0
607

 

लोणावळा, दि.२४ (पीसीबी) – राज्यात नाईलाजास्तव शासनाकडून संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तरी देखील काही उत्साही वाहन चालक आपली खाजगी वाहन घेऊन रस्त्यावर दिमाखात फिरत आहेत. अशा वाहन चालकांवर पोलिसांनी कडक कारवाई केली आहे. तर काहींना दंडुक्याने चांगलाच चोप दिला आहे.

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्य सरकारने खबरदारीसाठी सार्वजनिक ठिकाणी संचारबंदी लागू करून अनेक शहर लॉकडाऊन ठेवली आहेत. मात्र तरी देखील काही नागरिक रस्त्यांवर गाड्या घेऊन फिरत आहेत. अशा नागरिकांवर पोलिसांनी चांगलीच कारवाई केली आहे.

महानगरातील चौकाचौकांत पोलीस बंदोबस्तासाठी आहेत. तथापि, पोलिसांचे भय न बाळगता सुसाट वेगाने वाहने दामटली जात असल्याचे दिसत आहे. जमावबंदी लागू झाली असताना आणि पाचपेक्षा अधिक नागरिक एकत्र आल्याचे निदर्शनात येत असताना पोलिसांनी अशांना चांगलाच चोप दिला आहे.

मुंबई,पुणेशहर, पिंपरी-चिंचवड, लोणावळाशहर, कामशेत, कार्ला, वडगाव, पुणेग्रामीण भागात या ठिकाणी पोलीस कठोर भूमिका घेत असल्याच दिसत आहे. तर काही ठिकाणी पोलीस नागरिकांना समज देऊन पुन्हा घरी जायला सांगत आहेत. आवश्यकता असेल तरच बाहेर पडा अन्यथा लाठीचा प्रसाद खा ! असाही सल्ला पोलिसांकडून देण्यात येत आहे.