Bhosari

आळंदीत शेताला पाणी देण्यासाठी गेलेल्या महिलेवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न; आरोपी फरार

By PCB Author

February 15, 2019

आळंदी, दि. १५ (पीसीबी) – शेतातील पिकाला पाणी देण्यासाठी गेलेल्या एका ३० वर्षीय महिलेचा हात धरुन अश्लिल भाषेत बोलून तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना गुरुवारी (दि.१४) दुपारी साडेतीनच्या सुमारास आळंदी पोलीस ठाणे हद्दीतील मरकळ बागवान वस्ती समोरील विनायक भोंगळे यांच्या शेतात घडली.

याप्रकरणी पिडित ३० वर्षीय महिलेने आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, मच्छींद्र बागुले नावाच्या इसमाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिडित महिला हि गुरुवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास मरकळ बागवान वस्ती समोरील विनायक भोंगळे यांच्या शेतातील पिकांना पाणी देण्यासाठी गेली होती. इतक्यात तीथे आरोपी मच्छींद्र आला. त्याने महिलेला अश्लिल भाषेत बोलण्यास सुरुवात केली. यावर महिला तेथून निघुन जाण्याचा प्रयत्न केला. मात्र मच्छींद्र याने तिचा हात पकडून अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करुन विनयभंग केला. आरोपी मच्छींद्र सध्या फरार असून आळंदी पोलीस त्याचा शोध घेत आहेत.