आळंदीत मार्केटींग व्यावसायिकेच्या घरात ९ लाखांची घरफोडी

0
553

आळंदी, दि. २२ (पीसीबी) – एका मार्केटींग व्यावसायिक महिलेच्या घरातून अज्ञात चोरट्यांनी तब्बल ३ लाखांची रोख आणि ३० तोळे सोने असे एकूण ९ लाखांचा ऐवज चोरुन नेला. ही घटना सोमवारी (दि.२१) सायंकाळी चारच्या सुमारास आळंदीतील सोपानजाई पार्क येथे घडली.

याप्रकरणी ४५ वर्षीय व्यावसायिक महिलेने आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला या आळंदीतील सोपानजाई पार्क येथे राहतात. सोमवारी सायंकाळी चारच्या सुमारास त्यांचे घर कुलुप लावून बंद असताना अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराच्या मुख्य दरवाजाचा कडीकोयंडा उचकटून आत प्रवेश केला. तसेच बेडरुम मधील लोखंडी कपाटातील लॉकरचे लॉक तोडून त्यातील तब्बल ३ लाखांची रोख आणि ३० तोळे सोने असे एकूण ९ लाखांचा ऐवज चोरुन नेला. याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आळंदी पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत.