Bhosari

आळंदीत पालखीच्या गर्दीत सरासपणे पिस्तुल घेऊन फिरणाऱ्या सराईताला अटक

By PCB Author

June 26, 2019

आळंदी, दि. २६ (पीसीबी) – देहु फाटा येथे पालखीच्या गर्दीत सरासपणे एक देशी बनावटीचे पिस्तुल आणि तीन जिवंत काडतुसे घेऊन फिरणाऱ्या भोसरी पोलीस ठाण्यातील रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार दत्ता एकनाथ लोणकर (वय ३५, रा. लांडेवाडी, विठ्ठलनगर, भोसरी) याला गुन्हे शाखा युनिट एकच्या पोलिसांनी अटक केली आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम तांगडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, आज सकाळी आळंदीतील पालखी दरम्यान कुठलाही अनुचीत प्रकार घडुनये म्हणून गुन्हेशाखा युनिट १ चे पथक पालखी मार्ग देहुफाटा येथे बंदोबस्तावर होते. यावेळी पोलिसांना पाहुण एका इसम पळू लागला. पोलिसांना त्याच्यावर संशय आल्याने पोलिसांनी पाठलाग करुन त्याला ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या कंबरेला एक देशी बनावटीचे पिस्तुल आणि तीन जिवंत काडतुसे आढळून आली. पोलिसांनी ती जप्त करुन त्याला अटक केले. पुढील चौकशी दरम्यान तो भोसरी पोलीस ठाणे हद्दीतील सराईत गुन्हेगार दत्ता लोणकर असल्याचे समोर आले. त्याच्यावर खून खूनाचा प्रयत्न असे एकूण ७ गंभीर गुन्हे भोसरी पोलीस ठाण्यात दाखल आहेत.

तसेच २००७ साली भोसरीतील नंदु लांडे खुना प्रकरणात दत्ता लोणकर हा साक्षीदार होता. या प्रकरणात बबलु शेख आरोपी होता. दत्ता लोणकर याने कोर्टामध्ये साक्ष देऊ नये यासाठी बबलु त्याला वारंवार दमदाटी करत होता. यामुळे दत्ता याने लक्ष्मीकांत गालफाडे, संजय जाधव, अमजर बाकरा आणि योगेश जाधव यांच्यासह मिळून बबलू शेख याचा खून केला होता.