Bhosari

आळंदीत टोळक्यांनी ट्रव्हल्स व्यावसायिकाला लुटले

By PCB Author

December 23, 2018

आळंदी, दि. २३ (पीसीबी) – कार्यालयात मित्रांसोबत पैसे मोजत बसलेल्या एका ट्रव्हल्स व्यावसायिकाला दहा ते बारा जणांच्या टोळक्यांनी जबर मारहाण करुन त्यांच्याजवळील रोख ६५ हजार रुपये लुटून नेले. ही घटना शनिवारी (दि.२२) रात्रीच्या सुमारास आळंदी येथील चऱ्होली खुर्दमधे घडली.

याप्रकरणी व्यावसायिक भागवत शिवाजी मोरे (वय २८, रा. एलआयसी बिल्डींग, निलप्रभा हौसींग सोसायटी, बिल्डिंग नं. १३, फ्लॅट नं. ११०८, यमुनानगर, निगडी) यांनी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञात दहा ते बाराजणांच्या टोळक्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी भागवत मोरे यांचा टुर्स अॅण्ड ट्रव्हल्सचा व्यावसाय आहे. शनिवारी रात्रीच्या सुमारास मोरे हे आळंदी चऱ्होली खुर्दमधील त्यांच्या कार्यालयात मित्र दत्ता नाईक आणि बालाजी बिडकर यांच्यासोबत पैसे मोजत बसले होते. यावेळी अचानक हातात कोयते आणि दांडके घेऊन अज्ञात दहा ते बारा जणांच्या टोळक्यांनी मोरे यांच्या कार्यालयात प्रवेश केला. आणि मोरेसह मित्र नाईक आणि बिडर यांना जबर मारहाण करुन त्यांच्याजवळील ६५ हजारांची रोख जबरदस्तीने हिसकावून नेले. याप्रकरणी आळंदी पोलीस ठाण्यात अज्ञात दहा ते बाराजणांच्या टोळक्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आळंदी पोलीस अधिक तपास करत आहेत.