Bhosari

आळंदीत टवाळखोरांची वाढली डेरिंग, पोलिसांसमोर तरुणीचा हात धरुन विनयभंग

By PCB Author

October 14, 2018

आळंदी, दि. १४ (पीसीबी) – एका २६ वर्षीय तरुणीला कांदा फेकून मारत, ‘तु मला खुप आवडतेस’, असे म्हणून हात धरुन विनयभंग केल्याचा प्रकार पोलिसांसमोर घडला आहे. ही धक्कादायक घटना शनिवारी (दि.१३) सायंकाळी सहाच्या सुमारास आळंदीतील सरकारी रुग्णालयाशेजारी असलेल्या भाजीपाल्याच्या गाळ्याजवळ घडली.

याप्रकरणी पीडित २६ वर्षीय तरुणीने आळंदी पोलीसात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार सोपान बाबुराव पतंगे (रा. पद्मावती रोड, आळंदी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी सायंकाळी सहाच्या सुमारास पीडित २६ वर्षीय तरुणी आळंदीतील सरकारी रुग्णालयाशेजारी असलेल्या भाजीपाल्याच्या गाळ्याजवळून जात होती. यावर तेथे बसलेला आरोपी सोपान याने तरुणीला कांदा फेकून मारला. तरुणीने त्याचा जाब विचारला असता आरोपीने तरुणीच्या जवळ जाऊन तिचा हात पकडत ‘तु मला खुप आवडतेस मला तुझ्यासोबत झोपायचे आहे माझ्यासोबत चल’ यावर तरुणीने हात झटकत तिची सुटका करुन आळंदी पोलिसांना फोन केला. पोलिस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यावेळी देखील आरोपीने पोलिसांसमोर तरुणीचा हात ओढत  ‘तु मला खुप आवडतेस मला तुझ्यासोबत झोपायचे आहे माझ्यासोबत चल’ असे म्हणाला. पोलिसांनी सोपान याला अटक केली आहे. त्याला एक दिवसाचे रिमांड देण्यात आले आहे. आळंदी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चौधर तपास करत आहेत.

दरम्यान आळंदीतील सरकारी रुग्णालयाशेजारी असलेल्या भाजीपाल्याच्या गाळ्याजवळ असा घटना नेहमी घडतात मात्र बऱ्याचदा प्रकरण दाबले जाते यामुळे तेथील टवाळखोरांना पोलिसांचा धाक राहिलेला नाही. यामुळे टवाळखोरावर कडक कारवाई करण्याची मागणी आळंदीतील ग्रामस्तांनी केली आहे.