Bhosari

आळंदीत ज्ञानेश्वर महाराज विश्वस्त मंडळाचे विश्वस्त प्रभाकर महाराज शास्त्री यांची गळफास घेऊन आत्महत्या

By PCB Author

September 18, 2018

आळंदी, दि. १८ (पीसीबी) – ज्ञानेश्वर महाराज विश्वस्त मंडळाचे विश्वस्त प्रभाकर महाराज शास्त्री यांनी आज (मंगळवारी) सकाळी आठच्या सुमारास आळंदी येथील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज सकाळी आठच्या सुमारास  प्रभाकर महाराज शास्त्री यांच्या घरच्यांनी त्यांच्या खोलीमध्ये पाहिले असता खोलीतील पंख्याला त्यांचा मृतदेह आढळून आला. घरच्यांनी त्यांना खाली उतरवून तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. आत्महत्याचे कारण अद्याप समजूशकले नाही. आळंदी पोलीस तपास करत आहेत.