आळंदीत एसटी बस जळून खाक

0
634

आळंदी, दि. १९ (पीसीबी) – नांदेड-आळंदी या एसटी बसला गुरुवारी (दि.१८) पहाटे तीनच्या सुमारास आळंदी येथे अचानक आग लागली. यामध्ये ही एसटीबस जळून खाक झाली आहे.

याप्रकरणी दिघी पोलिस ठाण्यात आकस्मिक घटनेची नोंद केली असून, पंचनामा करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी (दि.१७) आळंदी-नांदेड ही कंधार आगाराची एसटीबस मुक्‍कामी आळंदी स्थानकात आली होती. चालक आणि वाहक दोघेही बसमध्ये झोपले होते. गुरुवारी (दि.१८) पहाटे तीनच्या सुमारास बसला अचानक आग लागली.  याची माहिती पोलिसांना मिळताच ते घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने चालक, वाहकास वेळीच बाहेर काढले. शॉर्टसर्किट अथवा चालक-वाहकाने झोपताना लावलेल्या कॉईलमुळे आग लागली असावी, असा प्राथमिक अंदाज व्यक्‍त केला जात आहे. पुढील तपास पोलिस हवालदार कळंके करत आहेत.