आळंदीत एटीएम कार्डची अदलाबदल करुन एकाला ७० हजारांचा गंडा

0
549

आळंदी, दि. १३ (पीसीबी) – अज्ञात चोरट्याने एका ५५ वर्षीय इसमाचे एटीएम कार्ड अदलाबदल करुन त्या व्दारे वेळोवेळी एकुण ६९ हजार ९९५ रुपयांची रक्कम काढून घेत गंडा घातला. ही घटना २७ जानेवारी ते २८ जानेवारी या दरम्यान घडली.

याप्रकरणी भागवत बबन कुमावत (वय ५५, रा. हिरापुर रोड, तुळजाभवानीनगर, नवीन पाण्याचे टाकीजवळ, चाळीसगाव, जि. जळगाव) यांनी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञात इसमाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवार (दि.१७ जानेवारी) रोजी फिर्यादी भागवत कुमावत हे त्यांचे एसबीआय बँकेचे एटीएम घेऊन पैसे काढण्यासाठी आळंदी येथील बँक ऑफ महाराष्ट्रच्या एटीएम सेंटरवर गेले होते. ते पैसे काढून बाहेर मोजत असताना अज्ञात चोरट्याने त्यांच्या एटीएम कार्डची अदलाबदल केली आणि वेळोवेळी भागवत यांच्या एसबीआय बँकेच्या खात्यातून एकूण ६९ हजार ९९४ ऐवढी रक्कम काढून घेत गंडा घातला. याप्रकरणी आळंदी पोलीस ठाण्यात गु्नहा दाखल करण्यात आला आहे. आळंदी पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.