आळंदीकरांची वाहतूककोंडीतून लवकरच मुक्तता करू – पोलीस आयुक्त

0
722

आळंदी, दि. १८ (पीसीबी) – आळंदी हे तीर्थक्षेत्र असल्याने येथे कायमस्वरूपी भाविकांची वर्दळ सुरू असते. राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. त्यामुळे येथे वाहतूककोंडी नित्याची बाब होऊन बसली आहे. मात्र, यापुढे आळंदीकरांची या कोंडीतून आम्ही लवकरच मुक्तता करू, अशी ग्वाही पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त आर.के.पद्मनाभन यांनी दिली.

देहू –आळंदी रस्त्यावरील हिलमिस्ट या सुसज्ज इमारतीमध्ये पिंपरी-चिंचवड आयुक्तालयांतर्गत दिघी- आळंदी वाहतूक विभाग शाखेचे उद्घाटन आयुक्तांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते.

दरम्यान, आळंदी आणि चाकण पोलीस ठाण्याचा समावेश पिंपरी-चिंचवड आयुक्तालयामध्ये करण्यात आला आहे. आता प्रत्यक्ष कार्यवाही करण्यास सुरूवात झाली आहे. आता ठिकठिकाणी वाहतूक शाखांची उभारणी करण्यात येत आहे. पोलीस कर्मचारी व इतर सामुग्रीची कमतरता असली, तरी २ ते ३ महिन्यात सर्वकाही पूर्वपदावर आणण्याचा आमचा प्रयत्न सुरू असल्याचे आयुक्तांनी सांगितले.