आर्मी लिव्हिंग कॅम्पमध्ये चोरीचा प्रयत्न करणा-या दाम्पत्यास अटक

0
201

देहूरोड, दि. २१ (पीसीबी) – पती-पत्नीने देहूरोड येथील आर्मी लिव्हिंग कॅम्प एरियात चोरी करण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी पती-पत्नीला अटक करण्यात आली आहे. ही घटना शुक्रवारी (दि. 20) दुपारी साडेतीन वाजता घडली.

चरण शंकर काळे (वय 25), निकिता चरण काळे (वय 19, दोघे रा. किन्हईगाव, ता. हवेली) अशी अटक केलेल्या पती-पत्नीची नावे आहेत. याप्रकरणी पठाण अमजदखान (वय 42, रा. देहूरोड) यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे आर्मीमध्ये नोकरी करतात. ते देहूरोड येथील आर्मी लिव्हिंग कॅम्प एरियात पेट्रोलिंग करीत होते. त्यावेळी आरोपी आर्मी लिव्हिंग एरियात ठेवलेले दीड हजार रुपये किमतीचे जुने लोखंडी सामान पोत्यात भरून चोरी करण्याचा प्रयत्न करताना आढळून आले. फिर्यादी यांनी आरोपींना पकडून पोलिसांच्या हवाली केले. पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.