आर्थिक मदतीचे आवाहन

0
1517

पिंपरी, दि. १२ (पीसीबी) – किडनी प्रत्यारोपण करण्याची शस्त्रक्रिया करण्यात येणार्‍या विवाहितेला आर्थिक मदतीची गरज असून दानशूर संस्था, व्यक्तींनी मदत करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

रोहिणी अतुल झालसे-शिंदे (वय २७) असे शस्त्रक्रिया करण्यात येणार्‍या विवाहितेचे नाव आहे. दोन वर्षांपुर्वी रोहिणी यांच्या दोन्ही किडनी निकामी झाल्याचे निदान झाले. त्यानंतर गेल्या दोन वर्षांपासून त्यांच्यावर डायलेसीस सुरू आहे. रोहिणी यांच्या घरची परिस्थिती हालाखीची आहे. त्यांच्या घरच्यांना डायलेसीसचाही खर्च न झेपणारा आहे. त्यांच्या आईने मुलीला किडनी दान करण्याचे ठरवले. डॉक्टरांनी शस्त्रक्रियेचा खर्च सुमारे ११ लाख रूपये सांगितला.  पुढील औषधोपचारासाठी २-३ लाख रूपये खर्च येऊ शकतो. शासनाच्या विविध योजनांचा पाठपुरावा सुरू आहे. ती मदतही पुरेशी ठरणार नाही.

शस्त्रक्रिया येत्या २६ जुलै २०१९ ला गुजरात येथिल नाडियाद या शहरातील मुलजीभाई पटेल युरोलॉजी हॉस्पिटलमध्ये पार पडणार आहे. रोहिणी यांना आर्थिक मदतीची गरज असून दानशूर संस्था, व्यक्तींनी मदत करावी, असे आवाहन रोहिणी यांचा भाऊ शुभम झालसे यांनी केले आहे. आर्थिक मदतीसाठी- रोहिणी झालसे, गुगल पे नंबर ८३७९९१०४१६. अथवा रोहिणी नागराज झालसे, खाते क्रमांक- ६०१५८८५९८४०, बॅक ऑफ महाराष्ट्र, आयएफसी कोड- चअकइ००००१४. शाखा नाशिक सिटी. अधिक माहितीसाठी ७०५७००३५१३ या क्रमांकावर संपर्क साधावा.