आर्थिकदृष्ट्या मागासांना १० टक्के आरक्षण; मुख्यमंत्र्यांची घोषणा

0
650

मुंबई, दि. १२ (पीसीबी) –  महाराष्ट्रामध्ये आर्थिकदृष्ट्या मागासांना आरक्षणासाठीचा अध्यादेश  मंगळवारपासून (दि.१२) जारी करण्यात आला आहे. यापूर्वी आर्थिकदृष्ट्या मागास घोषित झालेल्या मराठा समाजाला या दहा टक्के आरक्षणाचा लाभ मिळणार नाही. याआधी मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण मंजूर केले आहे. ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ८ लाखांपर्यंत आहे, त्यांना या आरक्षणाचा फायदा  मिळणार आहे.

आर्थिकदृष्ट्या मागासांना आरक्षणाचा लाभ शैक्षणिक संस्थामध्येही मिळणार आहे. राज्यातील अल्पसंख्यांक समाजाचा शाळा वगळता सर्व खासगी, अनुदानित, विनाअनुदानित शैक्षणिक संस्थांमध्ये या आरक्षणाचा लाभ मिळणार आहे. तर राज्यातील सर्व सीबीएसई आंतरराष्ट्रीय बोर्डातही हे आरक्षण लागू होणार आहे. याशिवाय सर्व उच्च महाविद्यालये, वैद्यकीय शिक्षण, तसेच सर्व विनाअनुदानित महाविद्यालयामध्ये हे आरक्षण लागू  होणार आहे.

नोकऱ्यांमध्ये शासकीय आस्थापना, निमशासकीय आस्थापना, महामंडळे, स्थानिक स्वराज्य संस्था, निमशासकीय संस्था, अनुदानित, विनाअनुदानित शैक्षणिक संस्थांमध्ये या आरक्षणाचा फायदा मिळणार आहे. महाराष्ट्रात होणाऱ्या सर्व मेगाभरती, शिक्षण सेवक भरतीमध्ये १० टक्के आरक्षण लागू होणार आहे.