“आर्ट ऑफ लिव्हिंग” मार्फत पिंपरी चिंचवड पोलिसांकरिता मोफत “ध्यान व श्वास” ऑनलाईन शिबिर

0
318

पिंपरी, दि. ५ (पीसीबी) – कोविद -१९ च्या प्रादुर्भावाच्या अनुषंगाने जागतिक शांतिदूत परमपूज्य श्री श्री रविशंकरजी यांच्या प्रेरणेने “द आर्ट ऑफ लिव्हिंग” मार्फत पिंपरी चिंचवड पोलिसांकरिता मोफत “ध्यान व श्वास” ऑनलाईन शिबिराचे आयोजन केले गेले. पोलिसाची रोगप्रतिकारशक्ती वाढण्यासाठी, तणावमुक्त व निरोगी, आनंदी जीवनासाठी योग, प्राणायाम, ध्यान सह जगप्रसिद्ध सुदर्शन क्रिया हि शिकवली गेली. हे शिबीर ६ सत्र मध्ये घेतली गेली. सुमारे ५०० पोलिसानी ह्यामध्ये सहभाग घेऊन उत्कृस्ट आनंदाची शांतीची अनुभिति घेतली.

पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई व अतिरिक्त पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे , पोलीस उपायुक्त सुधीर हिरेमठ ,सहा.पोलीस आयुक्त आर.आर पाटील.यांनी दिलेल्या ग्याजेट पत्र द्वारे भरपूर पोलिसानी खूप चांगला प्रतिसाद दिला. हे शिबीर आयोजन साठी पोलीस उपनिरीक्षक नंदराज गभाले व पोलीस शिपाई दादासाहेब घोडके आणि आर्ट ऑफ लिव्हिंग चे प्रशिक्षक राजेंद्र गायकवाड, सचिन नाईक व आर्ट ऑफ लिव्हिंग राज्य समन्वयक सुनील पोद्दार ह्यांनी पुढाकार घेतला. तसेच आर्ट ऑफ लिव्हिंग चे प्रशिक्षक रोहिणी ओक, राजेंद्र गायकवाड, सचिन नाईक, राहुल पटेल, विद्या शिर्के, गौरव डोग्रा, शगुन पंडित, तुषार अल्हाट, अनघा अथळे, दीपिका सुर्वे, माधुरी सावंत, बाळासाहेब बिचुकले ह्यांनी हे प्रशिक्षण शिबीर ६ सत्र मध्ये घेतले. त्यामुले पोलीस तणावमुक्त आणि शांती जी कधी आधी न अनुभवली अशी अनुभवली.

पोलिसानी अशी हि प्रतिक्रिया दिली आहे कि त्यांनी जो तणावमुक्त शांतीपूर्ण सुखद मन , आनंद अनुभवला व खूप रोग प्रतिकारशक्ती वाढली ह्या आर्ट ऑफ लिव्हिंग शिबिरामध्ये अनुभवाला जो आजपर्येंत आधी कुठे नाही मिळाला. सर्व पोलिसानी आर्ट ऑफ लिव्हिंग चे खूप खूप आभार मानले. तसेच पोलीस आयुक्त व पोलीस उपायुक्त ह्यांनी हि संधी दिल्या बदल हि त्यांचे खूप आभार मानले. या अमूल्य सेवा कार्यासाठी पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांनी आर्ट ऑफ लिव्हिंग प्रशिक्षकांचा कौतुक प्रमाणपत्र आणि पुरस्कार देऊन सम्मान हि केला आहे.