आर्ट ऑफ लिव्हिंगचे श्री श्री रविशंकर यांच्या जन्मदिवसानिमित्त शुक्रवारी रक्तदान, अन्नदान

0
222

पिंपरी, दि. १२ (पीसीबी) – आर्ट ऑफ लिव्हिंगचे सर्वेसर्वा श्री श्री रवीशंकर यांचा ६६ वा जन्मदिवस  शुक्रवारी (13 मे) रोजी साजरा होत आहे. त्यानिमित्त शहरात ठिकठिकाणी रक्तदान शिबिर, अन्नकोट, सेवा, साधना, सत्संग आयोजित करण्यात आल्याची माहिती संयोजकांनी दिली.जगाला जीवन जगण्याची कला शिकवणारे आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रणेते, आध्यात्मिक गुरू श्री श्री रविशंकर यांचा जन्मदिवस शुक्रवारी (दि 13)  सेवा, साधना आणि सत्संगासह विविध कार्यक्रमांनी साजरा होणार आहे. या निमित्त शहराच्या विविध भागात रक्तदान शिबिर व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.

श्री श्री रवीशंकर यांचा ६६ वा जन्मदिवस शुक्रवारी उत्साहात साजरा होत आहे. त्यानिमित्त आर्ट ऑफ लिव्हिंगतर्फे स्वारगेट येथील  गणेश कला क्रीडा मंदिरात गुरुपूजा, ध्यान प्राणायाम, सत्संग आयोजित करण्यात आला आहे.  शुक्रवारी सायंकाळी 6.45 ते रात्री 9 दरम्यान हा कार्यक्रम होत असून सर्वांसाठी खुला आहे.

ठिकठिकाणी रक्तदानयज्ञ

हिंगणे खुर्द, आनंद नगर येथील जगताप स्कूल येथे शुक्रवारी सकाळी 8 ते 10 या वेळेत रक्तदान शिबिर आयोजित केले आहे.
बाजीराव रोडवरील आप्पा बळवंत चौक येथील आनंद आश्रम येथे सकाळी 9.30 ते 2 तर स्वारगेटजवळील गणेश कला मंदिराशेजारी जनकल्याण रक्तपेढी येथे सायंकाळी 4 ते 8 या वेळेत नागरिक रक्तदान करू शकतील.

सातारा रोडवरील सिटी प्राईड थिएटरजवळ पार्वती इंडस्ट्रियल इस्टेट,  इलेक्ट्रॉनिक इस्टेट हॉलजवळ घोलप ब्लड बँक येथे सकाळी 9 ते 5 तर भारती हॉस्पिटलमध्ये ब्लड बँकेत सकाळी 10 ते 5 या वेळेत रक्तदान शिबीर आयोजित केले आहे.

रामवाडीत सत्संग, अन्नकोट

पूर्व पुणे भागातील नगर रोडवरील रामवाडी येथील पापळ सेमिनारी हॉलमध्ये शुक्रवारी सायंकाळी 6 वाजता गुरू पूजा, छप्पन्न भोग, सत्संग व महाप्रसादाचे आयोजन केले आहे. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे.

रविवारीही ठिकठिकाणी रक्तदान शिबिरांचे आयोजन

खराडी येथील ब्लूबेरी सोसायटीच्या समोरील पीएमसी हॉलमध्ये रविवारी ( 15) सकाळी 10 ते दुपारी 2 या वेळेत तर पाषाण येथील बाणेर-पाषाण लिंक रोडवरील संत तुकाराम शाळेत सकाळी 9.30 ते 1 या वेळेत रक्तदान शिबिर होणार आहे.
कोथरूड येथील कर्वे पुतळ्याजवळील वृत्ती सोल्युशन्स येथे सकाळी 9 ते 2 तर डॉ. मुळे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, प्लॉट नं.6, सेंट लॉरेन्स कॉलनी, बी टी कवडे रोड, वानोवरी येथे सकाळी 9 ते दुपारी 2 या वेळेत नागरिकांनी रक्तदान करावे, असे आवाहन आर्ट ऑफ लिव्हिंगने केले आहे.

पिंपरी चिंचवडमध्ये ठिकठिकाणी आज ब्लड डोनेशन कॅम्प

मोशी प्राधिकरण, अभिषेक इंटरनॅशनल स्कूल येथे शुक्रवारी सकाळी 8.30 ते 2.30  तर मंचर येथील धर्म राजा प्लाझा सकाळी 9 ते दुपारी 2 या वेळेत रक्तदान शिबीर आयोजित केले आहे.

पिंपरी चिंचवड येथील मारुती मंदिर, पोलिस स्टेशनच्या मागे, रहाटणी, पिंपळे सौदागर येथे रविवारी ( दि 15) सकाळी 10 ते दुपारी 1 तर नॉव्हेल इंटरनॅशनल स्कूल, संभाजीनगर, चिंचवड एमआयडीसी येथे  सकाळी 8.30 ते दुपारी 1 या वेळेत रक्तदान शिबीर होणार आहे.

एक थेंब प्राण वाचवू शकतो…

उन्हाळ्यात रक्त टंचाई भासते. ही गरज ओळखून आर्ट ऑफ लिव्हिंगतर्फे रक्त पेढ्यांच्या सहकार्यातून शहरात मोठ्या संख्येने रक्तदान शिबिरांचे आयोजन केले आहे.  रक्ताचा प्रत्येक थेंब महत्त्वाचा आहे. त्यामुळे एखाद्या व्यक्तीचे प्राण वाचले जाऊ शकतात. नागरिकांनी सामाजिक बांधिलकी म्हणून शुक्रवारी आणि रविवारी होत असलेल्या  रक्त संकलन मोहिमेत सहभागी होत रक्तदान करावे, असे आवाहन आर्ट ऑफ लिव्हिंगने केले आहे.