Maharashtra

आर्ची अर्थात रिंकू राजगुरूला या बॉलिवूड अभिनेत्यासोबत जायचंय डेटवर!

By PCB Author

April 20, 2019

मुंबई, दि. २० (पीसीबी) – सैराट चित्रपटातून अभिनेत्री रिंक राजगुरु हिने प्रेक्षकांची मने जिंकली होती. आता ती कागर चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

रिंकू राजगुरुने कलर्स मराठीवरील ‘एकदम कडक’ या कार्यक्रमाला उपस्थिती लावली होती. कोणत्या अभिनेत्यासोबत तुला डेटवर जायला आवडेल, रितेश देशमुख की वीकी कौशल?, असा प्रश्न तिला यावेळी विचारण्यात आला होता. रिंकूने क्षणाचाही विलंब न लावता विकी कौशलचे नाव घेतले. त्यामुळे रिंकू विकीची चाहती असल्याचं स्पष्ट झालं.

दरम्यान, ‘उरी : द सर्जिकल स्ट्राइक’ या चित्रपटाच्या माध्यमातून विकी कौशल घरोघरी पोहचला आहे. त्याची लोकप्रियताही चांगलीच वाढली आहे.