आरोग्य सुविधा, वीजेत सवलत; सेनेचा वचननामा जाहीर

0
366

मुंबई, दि. १२ (पीसीबी) –  एकही वचन खोटे ठरणारे नाही, असे सांगत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज पक्षाचा वचननामा जाहीर केला. राज्याच्या तिजोरीचा विचार करूनच वचननामा बनवला असल्याचे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले.

१० रुपयांत चांगले सकस जेवण. तेही स्वच्छ आणि व्यवस्थित असेल. विशेषत: एका किचनमधून त्याचे वितरण केले जाईल. महिला बचत गटांतील महिलांना यामध्ये सामावून घेतले जाईल, असे शिवसेने वचननाम्यात म्हटले आहे. या शिवाय घरगुती वापरातील वीजेसाठी ३०० युनिटपर्यंत ३० टक्क्यांनी दर कमी करण्याचे आश्वासन शिवसेनेने दिले आहे. २०० प्राथमिक आरोग्य चाचण्या ज्या सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर आहेत. त्या आरोग्यचाचण्या एका रुपयात देण्याची ग्वाही वचननाम्यातून देण्यात आली आहे. तसेच अल्पभूधारक आणि आर्थिक दुर्बल घटकांतील शेतकऱ्यांच्या खात्यात प्रत्येक वर्षाला १०००० रुपये जमा करण्याचे वचन शिवसेनेने दिले आहे.