आरोग्य मंत्री डॉ.हर्षवर्धन जागतिक आरोग्य संघटनेचे कार्यकारी अध्यक्षपदी

0
261

नवी दिल्ली, दि. २० (पीसीबी) : कोरोनाविरोधातील या लढाईत भारताच्या उपाययोजनांचं कौतुक जागतिक स्तरावर केलं जात आहे. लोकसंख्येच्या बाबतीत मोठा देश असूनही अन्य देशांच्या तुलनेत कोरोनाचा प्रसार भारतात कमी आहे. भारतानं कोरोनाला रोखण्यासाठी उचलेल्या पावलामुळे जगालाही मदत झाली आहे. याचेच फलित म्हणून केंद्रीय आरोग्य मंत्री डॉक्टर हर्षवर्धन यांनी जागतिक आरोग्य संघटनेचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून निवडण्यात आलं आहे. हर्षवर्धन 22 मे रोजी पदभार स्वीकारणार असल्याची माहिती हाती आली आहे.

क्षेत्रीय गटांमध्ये अध्यक्ष पद एक वर्षासाठी दिलं जातं. गेल्या वर्षी हे ठरवण्यात आलं होतं. येत्या शुक्रवारपासून यातील पहिलं वर्ष सुरू होणार असून यासाठी भारताचा प्रतिनिधी कार्यकारी मंडळाचा अध्यक्ष असणार आहे. आरोग्य सभेच्या सर्व निर्णयांना आणि धोरणांना प्रभावी बनवण्यासाठी योग्य सल्ला देण्याची जबाबदारी कार्यकारी मंडळाच्या अध्यक्षांकडे असते. या कार्यकाळी मंडळाच्या वर्षातून दोन बैठका होतात आणि यापैकी मुख्य बैठक ही जानेवारी महिन्यात होते.

जपानच्या डॉ हिरोकी नकाटानी यांच्या जागी नियुक्ती
डॉ. हर्षवर्धन जपानच्या डॉ हिरोकी नकाटानी यांची जागा घेतील. नकाटानी सध्या 34 सदस्यीय डब्ल्यूएचओ कार्यकारी बोर्डाचे अध्यक्ष आहेत. जागतिक आरोग्य संघटनेचे दक्षिण पूर्व आशिया समुहाने गेल्या वर्षी सर्वानुमते निर्णय घेतला होता की, भारताला तीन वर्षांसाठी कार्यकारी मंडळावर निवडलं जावं. मंगळवारी 194 देशांच्या जागतिक आरोग्य सभेमध्ये भारताला कार्यकारी मंडळात नियुक्त करण्याबाबतच्या प्रस्तावावर सह्या झाल्या असल्याची माहिती आहे.