Maharashtra

आरेला हात लावला, तर सहन करणार नाही – आदित्य ठाकरे  

By PCB Author

September 10, 2019

मुंबई, दि. १० (पीसीबी) – शिवसेनेचा मेट्रोला विरोध नसून आरे कारशेडमध्ये उभारण्यात येणाऱ्या प्रस्तावित कारशेडला विरोध आहे, असे युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी आज (मंगळवार) पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.  आरेला हात लावला, तर सहन करणार नाही,  असा इशाराही  त्यांनी दिला.

यावेळी आदित्य ठाकरे यांच्यासोबत काही तज्ञ उपस्थित होते.  त्यांनी सादरीकरण करत आरेचे महत्त्व पटवून दिले.

आदित्य ठाकरे म्हणाले की,  मेट्रो कारशेडसाठी करण्यात येणाऱ्या वृक्षतोडीला आमचा विरोध कायम  आहे.  ठाकरे यांनी वन्यजीवांचे फोटो, व्हिडीओ दाखवत  मुंबई मेट्रो रेल्वे महामंडळाचा दावा फेटाळून लावला. इतकी मनमानी आजपर्यंत कोणीही केलेली नाही. मुंबईकर, न्यायालयाची धमकी दिली जात आहे.

मुंबई मेट्रो रेल्वे महामंडळाकडून घोटाळा केला जात आहे का ? अशी शंकाही आदित्य ठाकरे यांनी या वेळी व्यक्त केली आहे. तांत्रिक मुद्द्यांवर फक्त चर्चा होत असून वस्तुस्थितीबद्दल कोणीही बोलत नाही,  अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.