आरपीआयमधून लढा; खासदार उदयनराजेंना रामदास आठवलेंची ऑफर

0
396

मुंबई, दि. ८ (पीसीबी) – सातारा लोकसभा मतदारसंघातून खासदार उदयनराजे भोसले यांना पुन्हा उमेदवारी देण्यास स्थानिक पदाधिकारी आणि नेत्यांनी विरोध दर्शवला आहे. हाच धागा पकडत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नेते व केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी उदयनराजेंना ऑफर दिली आहे. सातारा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीकडून उमेदवारी न मिळाल्यास रिपाइंकडून लढावे, असे आठवले यांनी म्हटले आहे.