Others

आरटीओमध्ये दोन ट्रक चालकांचे भांडण ; एकास बेदम मारहाण

By PCB Author

April 13, 2022

मोशी, दि. १३ (पीसीबी) – आरटीओ मध्ये ट्रक पासिंग करण्यासाठी गेलेल्या एका ट्रक चालकाला दुस-या ट्रक चालकाने बेदम मारहाण केली. ही घटना सोमवारी (दि. 11) सकाळी पावणे अकरा वाजता मोशी येथे घडली.

बंडाप्पा सिद्राराम स्वामी (वय 46, रा. कुदळवाडी, चिखली) यांनी याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार ट्रक क्रमांक एम एच 14 / ई एम 5716 या ट्रक चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे त्यांचा ट्रक पासिंग करण्यासाठी मोशी येथे आरटीओ मध्ये गेले होते. फिर्यादी यांच्या ट्रकच्या मागे उभा असलेल्या आरोपी ट्रक चालकाने ‘तू मध्ये गाडी का लावली’ असे म्हणून फिर्यादीस हाताने मारहाण करून शिवीगाळ केली. त्यानंतर ‘थांब तुला दाखवतोच’ अशी धमकी देऊन लाकडी दांडक्याने फिर्यादी यांच्या हातावर मारून जखमी केले. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.