…..आरक्षणाला विरोध करेलच कसा ? – संभाजीराजे

0
545

कोल्हापूर, दि, २२ (पीसीबी) – छत्रपती संभाजीराजेंनी काल आरक्षण गेले खड्ड्यात ! पदवी पर्यंत सर्वच जातीच्या विद्यार्थ्यांना शिक्षण मोफत करा अशा आशयाच ट्वीट केले होते. त्यानंतर त्यांच्या या विधानावर नाराजी व्यक्त करण्यात आली होती. आणि आता संभाजीराजेंनी पुन्हा एकदा ट्वीट करून कालच्या वक्तव्याबद्दल झालेले गैरसमज दूर केले आहेत.

आज केलेल्या ट्वीटमध्ये त्यांनी आता मराठा आरक्षण दृष्टीक्षेपात आहे. ते टिकण्यासाठी प्रयत्न करतोय. मग मी आत्ता आरक्षणालाच विरोध कसा करीन ? छत्रपती शाहू महाराजांना अभिप्रेत असलेली आरक्षण व्यवस्था, ज्यामध्ये मराठा समाजाचाही समावेश होता, तीच आम्हालाही अभिप्रेत आहे.

शेतकरी आत्महत्येमागे त्यांची हतबलता हे एक कारण आहे. घरात खायला अन्न नाही, डोक्यावर कर्जाचा भार, त्यात लेकरांच्या शिक्षणाची भर. मग ते आत्महत्या करणार नाहीत तर काय करणार? तूर्तास हे शक्य नसल्यास किमान बारावीपर्यंत विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण मिळावे, अशी माझी मागणी आहे. येत्या अधिवेशनात संसदेत मी हा मुद्दा मांडणार आहे. ‘शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही’ असे म्हणत छत्रपती शाहू महाराजांनी आपल्या राज्यातील सर्वच जातींच्या विद्यार्थ्यांना मोफत शिक्षणाची व्यवस्था सुद्धा केली होती. त्यामुळे आजही सर्व विद्यार्थ्यांना पदवीपर्यंत मोफत शिक्षण मिळावे अशी सर्व समाजांच्या वतीने माझी मागणी आहे.