आय.सी.यू विभागाकरीता कॅप जेमिनी कंपनीने सी.एस.आर.फंडातून दिलेल्या १६ बेडसचे लोकार्पण शरद पवार यांच्या हस्ते

0
227

पिंपरी, दी.१६ (पीसीबी)- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या नवीन भोसरी रूग्णालयातील आय.सी.यू विभागाकरीता कॅप जेमिनी कंपनीने सी.एस.आर.फंडातून दिलेल्या १६ बेडसचे लोकार्पण खासदार शरद पवार यांच्या हस्ते आणि महापौर उषा उर्फ माई ढोरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले.

या कार्यक्रमास खासदार डॉ.अमोल कोल्हे, स्थायी सभापती अॅड. नितीन लांडगे, माजी आमदार विलास लांडे, माजी महापौर संजोग वाघेरे,विरोधी पक्षनेते शरद उर्फ राजू मिसाळ, अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, नगरसदस्य अजीत गव्हाणे, रवी लांडगे, विक्रांत लांडे, नगरसदस्या अनुराधा गोफणे, सारीका लांडगे, अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ.पवन साळवे, सहाय्यक आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ.लक्ष्मण गोफणे, कॅप जेमिनी कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रसाद शेटटी, ‍सहाय्यक आयुक्त राजेश आगळे,अण्णा बोदडे, ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. शैलजा भावसार, डॉ.निलेश ढगे, आदी मान्यवर उपस्थित होते.

कॅप जेमिनी कंपनी कडून आज महानगरपालिकेस १० आय.सी.यू यूनीट, ६ व्हेन्टीलेटर, १० मोनिटर, १० सिरींज पंप, १० बेड साईड लॉकर, १ हाई पॉवर एक्सरे मशीन, १ सोनोग्राफी मशीन, २ बायोमेडीकल वेस्ट कंटेनर, १वॉटर प्यूरीफायर, आदी सुमारे २ कोटी ५० लाखाची साहीत्य सी एस आर फंडातून सुपुर्द करण्यात आले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन माहिती व जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक यांनी केले.