आयुक्त साहेब ! पुनावळे येथील नियोजित कचरा डेपोची जागा ताब्यात घेण्याची हिम्मत दाखवा

0
305

पिंपरी, दि. २७ (पीसीबी) : पुनावळे येथील नियोजित कचरा डेपोची जागा ताब्यात घेण्याची हिम्मत दाखवा, अशी मागणी स्थायी समिती सदस्य नगरसेवक राजू बनसोडे यांनी आयुक्त राजेश पाटील यांना केली आहे.

आयुक्तांना दिलेल्या निवेदनात बनसोडे म्हणतात, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत १९९७ ला पुनावळे गाव समाविष्ठ करण्याव आले. त्यानंतर पुनावळे येथील ७४ एकर वनखात्याच्या जागेवर महापालिकेने कचरा डेपोचे आरक्षण टाकण्यात आलेले आहे.त्या जागेचा मोबदला म्हणुन ४ कोटी रुपये महाराष्ट्र शासनाकडे जमा केलेले आहेत.तसेच पिंपरी सांडस येथे वनखात्यासाठी जागा सुचवलेली आहे.मात्र पुनावळे कचरा डेपोच्या आजुबाजूला मोठ-मोठ्या बांधकाम व्यावसायीकांनी हजारो एकर जागा घेतली असल्याने गेली २३ वर्षापासुन कचरा डेपोला विरोध करण्यात येत आहे.आता पर्यंत जे जे आयुक्त महापालिकेत आले त्या सर्व आयुक्तांना याच बांधकाम व्यावसायीकांच्या बगलबच्यांनी दबाव टाकून कचरा डेपोची जागा ताब्यात घेण्यास मज्जाव केला, मात्र आयुक्त साहेब आपण तरी हि कचरा डेपोची जागा ताब्यात घेण्याची हिम्मत दाखवावी, असे आवाहन बनसोडे यांनी केले आहे.

मोशी येथील कचरा डेपोची क्षमता कधीच संपली आहे.तेथे कच-याचे डोंगर उभे राहिले आहेत तेथील नागरीक कचरा डेपोच्या दुर्गधीने त्रस्त आहेत आपण पुनावळे येथील कचरा डेपोची जागा ताब्यात घेऊन तेथे आधुनिक पध्दतीचा कचरा डेपो उभारावा जेनेकरुन पुनावळे कचरा डेपोच्या आजुबाजुच्या नागरीकाना या कचरा डेपोच्या दुर्गंधीचा त्रास होणार नाही.
आज पुनावळे कचरा डेपोच्या आजुबाजुला हजारो गगनचुंबी उंच-उंच इमारती तयार झाल्या आहेत. त्या बांधणारया बांधकाम व्यावसायीकांच्या फायद्यासाठी काही राजकारणी मंडळी या कचरा डेपोला विरोध करीत आहेत व कचरा डेपोची जागा ताब्यात घेवू नये म्हणुन प्रशासनावर आतापर्यंत दबाव आणत आहे.आज आयुक्त साहेब आपण कचरा समस्येसाठी इंदोर दौरा काढला मात्र पुनावळे कचरा डेपो आरक्षणाच्या जागेवर आपण गेला नाहीत.आपला ‘ काखेत कळसा आणी गावाला वळसा ‘ अस झाल आहे. कच -याची समस्या सोडवायची तर आयुक्त साहेब आपण विरोध झुगारुन पुनावळे कचरा डेपोची जागा ताब्यात घ्यावी.बांधकाम व्यावसायीकांच्या बगलबच्यांना तोंडघशी पाडावे अशी अपेक्षा नगरसेवक बनसोडे यांनी या पत्रकात व्यक्त केली आहे.