आयाराम गयाराम, जय श्रीराम ; राधाकृष्ण विखे-पाटलांच्यासमोर विरोधकांच्या घोषणा

0
501

मुंबई, दि. १७ (पीसीबी) – राज्य सरकारच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून (सोमवार)  सुरूवात झाली  त्याआधी नवनिर्वाचित गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील विधानभवनात येताच त्यांच्यासमोर   विरोधकांनी आयाराम गयाराम, जय श्रीराम  अशा घोषणा दिल्या.

या अधिवेशनासाठी राधाकृष्ण विखे पाटील विधान भवनात आले. तेव्हा आयाराम गयाराम जय श्रीराम, अशा घोषणा देण्यात आल्या. विकासाची सगळी स्वप्ने भंग, मुख्यमंत्री मंत्रिमंडळ विस्तारात दंग अशाही घोषणा देण्यात आल्या. त्याचबरोबर आले रे आले चोरटे आले, असे म्हणत विरोधकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात घोषणाबाजी केली.

दरम्यान, राधाकृष्ण विखे पाटील यांनी विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर त्यांना मंत्रिपद कसे काय दिले जाऊ शकते? एखाद्या पक्षाचा राजीनामा दिल्यानंतर दुसऱ्या पक्षात प्रवेश केल्यावर मंत्रीपद देणे योग्य आहे का? असा प्रश्न माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सभागृहात उपस्थित केला.  यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर देत राधाकृष्ण विखे पाटील यांची निवड योग्य त्या प्रक्रियेप्रमाणेच झाली आहे, असे स्पष्ट केले.