Maharashtra

आयात केले त्यांना पक्षातून काढून चूक सुधारण्याचा प्रयत्न करा; नवाब मलिकांचा चंद्रकांत पाटलांना टोला

By PCB Author

January 18, 2020

मुंबई, दि.१८ (पीसीबी) – राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि मंत्री नवाब मलिक यांनी देखील चंद्रकांत पाटील यांच्यावर शाब्दिक निशाणा साधला आहे. ते म्हणाले, तुमची चूक झाली असेल तर ती सुधारा आणि जे आमदार, खासदार झाले आहेत आणि नेते आयात केले त्यांना पक्षातून काढून चूक सुधारण्याचा प्रयत्न करा, असा सल्ला राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि मंत्री नवाब मलिक यांनी दिला आहे.

तसेच चंद्रकांत पाटील यांना हे उशिरा सूचले, हे जर अगोदर सूचले असते तर बरे झाले असते. इतर आले त्यांचे चोचले पुरवण्यासाठी निष्ठावान लोकांवर अन्याय केला गेला. निष्ठावान लोकांना या भरतीमुळे डावले गेले, अशी प्रतिक्रिया शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी दिली.

दरम्यान, शिवसेनेकडूनही हल्लाबोल करण्यात आलाय. शिवसेनेने म्हटले आहे, हे उशिरा सुचलेले शाहणपण आहे. तर राष्ट्रवादीने ज्यांना पक्षात स्थान दिले आहे. त्यांना बाहेरचा रस्ता दाखवा आणि आपली चूक सुधारा, असा सल्ला दिला आहे.